वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक साहाय्य मिळावे, यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून २० प्रकारच्या गंभीर आजारांना मदत दिली जाते. यासाठी रुग्णालयात उपचार सुरु करताच मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी अर्ज दाखल केल्यास आर्थिक मदत मिळताना अडचणी येत नाही. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून अर्थसहाय्य मिळत नाही.
मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णांना अर्थसाहाय्य दिले जाते. मुख्यमंत्री साहाय्यता निधी मिळण्यासाठी नियुक्त वैद्यकीय समिती रुग्णाच्या तपशीलाची शहानिशा करते. नोंदणीकृत रुग्णालयांची यादी cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय समितीच्या शिफारशीनुसार २५ हजार, ५० हजार तसेच १ किंवा २ दोन लाखापर्यंत रुग्णाच्या उपचारांसाठी रक्कम दिली जाते.
या आजारांसाठी मिळतो मुख्यमंत्री साहाय्यता निधी
कॉकलियर इम्पाल्ट ( २ ते ६ वयोगटासाठी)
हृदय प्रत्यारोपण
यकृत प्रत्यारोपण
किडनी प्रत्यारोपण
फुफ्फुस प्रत्यारोपण
बोन मॅरो प्रत्यारोपण
हाताचे प्रत्यारोपण
हिप रिप्लेसमेंट
कर्करोग शस्त्रक्रिया
अपघात शस्त्रक्रिया
लहान बालकांची शस्त्रक्रिया
मेंदूचे आजार
हृदयरोग
डायलिसिस
कर्करोग (केमोथेअरपी, रेडिएशन)
अपघात
नवजात शिशूंचे आजार
गुडघ्याचे प्रत्यारोपण
अपघातात त्वचा भाजल्याने उपचार घेणारे रुग्ण
विद्युत अपघाताचे रुग्ण
संपर्क क्रमांक – ०२२ – २२०२२६९४८
निधीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
अर्थसाहाय्याची मागणी ईमेलद्वारेही करता येते. त्यासाठी अर्जासह सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरुपात पाठवावी. कागदपत्रांच्या मूळ प्रती मुख्यमंत्री साहाय्यता निधीकडे टपालाद्वारे पाठवता येते. ईमेल आयडी – [email protected]
अर्जासोबत जोडायची कागदपत्रे
- अर्ज, निदान व उपचारासाठी लागणा-या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र (खासगी रुग्णालय असल्यास सिव्हिल सर्जनकडून प्रमाणपत्र प्रमाणित असावे), तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (१ लाख ६० हजार पेक्षा कमी असणे आवश्यक आहे)
- महाराष्ट्र राज्यातील नागरिक असलेल्या रुग्णाचे आधारकार्ड, रेशनकार्ड लहान बाळासाठी आईचे आधारकार्ड.
- अपघातग्रस्त रुग्णांसाठी एमएलसी रिपोर्ट आवश्यक आहे.
- प्रत्यारोपण शस्रक्रियेच्या रुग्णांसाठी झोनल ट्रान्सप्लान्ट कोर्डिनेशन कमिटीची मान्यता आवश्यकता बंधनकारक आहे.
- रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर उपलब्ध असल्याची खात्री करा.