अमेरिकेतील कॅलिफोर्नियात शनिवारी रात्री अंधाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत ९ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच अनेक जण जखमी झाले आहे. माहितीनुसार ही गोळीबाराची घटना रात्री १० वाजता घडली. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीकडे मशीनगन असल्याचा दावा केला जात आहे. या गोळीबारच्या प्रकरणात अजून एकाही संशयिताला पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही.
लॉस एंजेलिस टाईम्सच्या माहितीनुसार, मॉन्टेरी पार्क परिसरात सुरू असलेल्या चीनी नववर्ष जल्लोषात हा गोळीबार झाला. हे पार्क लॉस एंजेलिस शहरापासून जवळपास ११ किमी दूर आहे. या पार्कातील चीनी नववर्ष जल्लोषात १० हजार लोकं सामील होते.
Update: Death toll in a mass shooting in Monterey Park, California rises to ten, Reuters reported
— ANI (@ANI) January 22, 2023
संबंधित परिसरातील रेस्टॉरंट मालक सुंग वोन चोई यांनी गोळीबार झाल्याची माहिती दिली. चोई यांनी लांच एंजेलिस टाईम्सला सांगितले की, ‘तीन लोकं धावत धावत त्यांच्या दुकानावर पोहोचले आणि दरवाजा बंद करण्यास सांगितले.’ गोळीबार करणाऱ्या व्यक्तीकडे मशीनगन असल्याची माहिती त्या संबंधित लोकांनी चोई यांना दिली. ही घटना डान्स क्लबमध्ये झाल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. माहितीनुसार, या घटनेत जवळपास १६ लोकांना गोळी लागली आहे.
(हेही वाचा – अमेरिकेने केला एअर स्ट्राईक! सोमालियात अल शबाबचे ३० दहशतवादी ठार)
Join Our WhatsApp Community