राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार १४ फेब्रुवारीपर्यंत कोसळेल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाले यांनी केलेले हे विधान हास्यास्पद असल्याचा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. ते रविवारी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत अकोल्यात आले असता माध्यमांशी बोलत होते. राज्यातील सरकार बहुमताचा आकडा १६४ वरून १८४ पार करेल, असाही दावा त्यांनी केला आहे. दरम्यान जुनी पेंशन योजनेवरही त्यांनी भाष्य केले. भाजपचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित करावी, असा आग्रह अनेक पदवीधर, शिक्षकांचा आहे. त्यानुसार पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर बैठक आयोजित करू. बैठकीत सरकार आपली भूमिका मांडेल, असेही ते म्हणाले.
बीडमधील व्हिडिओ वरून भाजप प्रदेशाध्यक्षांनी विरोधकांना सुनावले. पंकजा मुंडे या राष्ट्रीय नेत्या असून, त्यांच्याबाबत सर्वांनाच आदर आहे. मात्र त्यांच्याविरोधात विरोधकांची टिमच षडयंत्र रचत असून, चुकीच्या बाबी पसरविण्यात येत असल्याचा आरोपही त्यांना केला. दरम्यान सध्या शिंदे-फडणवीस यांची संताजी-धनाजीसारखी जोडी १८-१८ तास वेगाने काम करीत असल्याचेही बावनकुळे म्हणाले.
(हेही वाचा – धरणात लघुशंका करणारे आता इतिहासात लघुशंका करायला लागले; धनंजय देसाईंची अजित पवारांवर टीका)
Join Our WhatsApp Community