Balasaheb Thackeray Birth Anniversary: बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत, पंतप्रधान मोदींचं ट्विट

166

महाराष्ट्रातील राजकारणात वर्चस्व गाजवणारे, सामर्थ्यवान, दमदार, प्रभावशाली, शिवसेनेचे संस्थापक, कुशल व्यंगचित्रकार, सामना वृत्तपत्राचे संस्थापक, संपादक आणि प्रभुत्व शैली असणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची सोमवारी, २३ जानेवारीला जयंती साजरी केली जाते. ही बाळासाहेबांची ९७व्या जयंती आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) एक खास ट्विट करून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. बाळासाहेंबांसोबत झालेला माझा विविध चर्चा आणि गप्पा नेहमी लक्षात राहतील. उत्तम ज्ञान आणि अमोघ वकृत्वाची देणगी बाळासाहेबांना लाभली होती. त्यांनी आपले जीवन लोककल्याणासाठी समर्पित केले होते.’

दरम्यान सोमवारी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने मुंबईत ठाकरे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. तसेच माटुंग्याच्या षणमुखानंद सभागृहात संध्याकाळी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करणार आहे. दुसऱ्या बाजूला विधिमंडळातील सेंट्रल हॉलमध्ये बाळासाहेंबाच्या जयंतीदिनानिमित्त सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण होणार आहे. शिवाय कुलाबामधील रिगल सर्कल येथील बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा संध्याकाळी ७ वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान हे दोन्ही कार्यक्रम एकाच वेळेत असल्यामुळे बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या अनावरण सोहळ्याला उद्धव ठाकरे गैरहजर राहण्याची चिन्ह असल्याचे म्हटले जात आहे.

(हेही वाचा – ‘मला याबाबत माहित नाही, मी या भानगडीत पडत नाही,’ शरद पवारांचं शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीवर मोठं विधान)

 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.