पुण्यातील टेमघर धरणाची गळती कायम सुरु असते. ती गळती थांबवण्यासाठी ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आली. मात्र तरीही धरणाची गळती थांबलेले नाही. धरणाची दुरुस्ती केल्यामुळे ९० टक्के गळती थांबल्याचा दावा करण्यात आला, तरी धरणाची गळती सुरु असल्याने आता जलसंपदा विभागाच्या कारभारावर शंका उपस्थित केली जात आहे.
धरणाच्या दुरुस्तीसाठी २०० कोटींची मागणी
पुण्यातील टेमघर धरणातून धोकादायक पद्धतीने होणारी पाणी गळती 2016 साली उघडकीस आली होती. त्यावेळी जलसंपदा विभागाकडून अनेक अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या प्रकरणी अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या धरणाच्या दुरुस्तीला सुरुवात झाली. हे धरण 2000 साली मंजूर झाले होते. पुढे यावर पाचशे कोटी रुपये खर्च करण्यात आले. तरीही धरणाची ही अवस्था जैसे थे राहिल्याने आणखी 200 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. 2000 साली पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात या धरणाला मंजुरी देण्यात आली आणि त्यासाठी 250 कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. या धरणाचे काम सोमा एंटरप्रायजेस या कंपनीला देण्यात आले. अविनाश भोसले हे या सोमा एंटरप्रायजेसच्या अनेक संचालकांपैकी एक होते. 2000 साली सुरु झालेले धरणाचे काम 2010 साली पूर्ण करण्यात आले. मात्र धरणाच्या भिंतींना मजबूत करण्यासाठी आवश्यक असलेले ग्राऊटिंगचे काम करण्यात आले नाही. धरणाच्या भिंतींमध्ये होल करुन त्यामध्ये सिमेंट-कॉंक्रिट भरण्याला ग्राऊटिंग म्हटले जाते. मात्र टेमघर धरणाच्या बाबतीत ही प्रक्रियाच न करण्यात आल्याने हे धरण सुरुवातीपासूनच गळायला लागले.
(हेही वाचा ‘या’ 21 ‘परमवीर’ सैनिकांच्या नावाने ओळखली जाणार अंदमान- निकोबारमधील बेटे)
Join Our WhatsApp Community