२०२२ मध्ये सर्वाधिक टी२० सामने खेळवण्यात आले. यामध्ये टी२० विश्वचषक, आशिया कप या महत्त्वाच्या स्पर्धांचा समावेश आहे. यंदाच्या वर्षात भारताच्या बऱ्याच स्टार क्रिकेटर्सनी चांगली कामगिरी केली आहे. ICC ने नुकतीच टीम ऑफ द ईयर संदर्भात घोषणा केली आहे. या टीमचे कर्णधारपद जोस बटलरला सोपवण्यात आले आहे. तर भारतीय संघातील महत्त्वाच्या ३ खेळाडूंचा यात समावेश करण्यात आला आहे.
( हेही वाचा : Social Media Influencers साठी केंद्राने जारी केली नवी नियमावली; नियमांचे उल्लंघन केल्यास 50 लाखांचा दंड )
भारतीय फलंदाज विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांच्यासह अष्टपैलू हार्दिक पंड्या यांना या आयसीसी ‘टीम ऑफ द ईयर’मध्ये स्थान मिळाले आहे. याशिवाय इंग्लंडचा खेळाडू सॅम करन, झिमाब्बेचा सिकंदर रझा, पाकिस्तानचे मोहम्मद रिजवान, हॅरीस रौफ यांनाही या संघात स्थान मिळाले आहे. आयसीसी ‘टीम ऑफ द ईयर’ हा संघ कसा असेल पाहूयात…
ICC T20 – टीम ऑफ द ईयर
- जोस बटलर ( कर्णधार आणि विकेटकीपर)
- मोहम्मद रिझवान
- विराट कोहली
- सूर्यकुमार यादव
- ग्लेन फिलिप्स
- सिकंदर रझा
- हार्दिक पंड्या
- सॅम करन
- वानिंदू हसरंगा
- हॅरीस रौफ
- जोश लिटिल
या संघात भारताचे ३, पाकिस्तानचे २, इंग्लंड २, श्रीलंका, न्यूझीलंड, झिम्बाब्वे आणि आयर्लंडच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे.
Join Our WhatsApp Community