ठाकरे गट आणि वंचित आघाडीच्या युतीची घोषणा करत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नरेंद्र मोदींनी स्वपक्षातही नेतृत्व संपवलेलं आहे, त्यामुळे एक दिवस मोदींच्या नेतृत्वाचाही अंत होईल, असे विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं होत. तर उद्धव ठाकरे देशाची वाटचाल सरळ-सरळ हुकूमशाहीकडे सुरू असल्याचे म्हणाले. पण मोदींवर टीका करण्याची लायकी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची नाही, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.
प्रसार माध्यमांसोबत बोलताना नारायण राणे म्हणाले की, ‘दोघांची पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची लायकी नाही. आपण कुठे आहोत, आपल्या मागे किती लोकं आहेत, आपले आमदार-खासदार किती आहेत? हे प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरेंनी पहावे. आता हे संपत चाललेत, आवळत चाललेत. सत्तेत होते, मुख्यमंत्री होते, आज कोण नाहीत. ५६ आमदार होते, आज १२पण राहिले नाहीत. आता त्यांनी बोलू नये, गप्प बसाव. मोदींवर टीका करू नये. जर आम्ही टीका करण्यासाठी पाठी लागलो, तर पळता भुई थोडी होणे
या युतीचा काही फरक पडत नाही. शिवशक्ती आहे कुठे? भीमशक्ती आहे कुठे? भीमशक्ती या राज्यात देशात आहे, पण प्रकाश आंबेडकरांकडे किती आहे? भीमशक्ती आणि प्रकाश आंबेडकरांचा काय संबंध? प्रकाश आंबेडकरांनी किती दलितांचे संसार बसवले?, असे सवाल नारायण राणेंनी केले.
(हेही वाचा – शिवशक्ती-भीमशक्ती युतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…)
Join Our WhatsApp Community