महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी १२८ वाहनांचा ताफा; चालकांची भरती करण्याऐवजी खासगी सेवेवर वर्षाला १७ कोटींचा खर्च

174

मुंबई महापालिकेच्यावतीने आजवर अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवांसाठी स्वत:च्या मालकीची वाहने खरेदी केली जात असत. परंतु मागील काही वर्षांपासून अनेक वाहन चालक हे सेवानिवृत्त झाले असून या रिक्त जागांवर महापालिका प्रशासनाने कोणतीही भरती केली नाही. त्यामुळे चालकांच्या रिक्त पदांची कारणे देत महापालिकेने मागील काही वर्षांपासून नव्याने वाहने खरेदी करण्याऐवजी खासगी वाहन सुविधा घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता तब्बल २३२ जीप व कार प्रवाशी वाहनांची सुविधा खासगी वाहन पुरवणाऱ्या संस्थांकडून घेतली जात आहेत.

१८५ दैनंदिन प्रवाशी वाहन सेवा पुरवल्या जातात

मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठा व मलनि:सारण खात्यांच्या जल अभियंता, मलनि:सारण प्रचालन, पाणी पुरवठा प्रकल्प, मुंबई मलनि:सारण प्रकल्प आदी विविध विभागांना वाहनसेवा पुरवण्यात येतात. या सर्व विभागांकडे महापालिकेच्या मालकीची एकूण १४५ जीप व १२ कार सुस्थितीत आहेत. या वाहनांमार्फत मुंबईसह मुंबई बाहेरील विभागात सुमारे १८५ दैनंदिन प्रवाशी वाहन सेवा पुरवल्या जातात. या व्यतिरिक्त या विभागांमध्ये वाहने व वाहन चालकांच्या कमतरतेमुळे २३२ जीप व कार प्रवाशी वाहन सेवा निविदा मागवून खासगी संस्थाद्वारे घेतली जात आहे. यापूर्वी महापालिकेने १०४ वाहनांची सेवांचे कंत्राट दिले असून याचे दोन वर्षांचे कंत्राट मार्च २०२३ रोजी संपुष्टात येत आहे, तर उर्वरीत १२८ वाहनांचे  जुलै २०२२ रोजी संपुष्टात आले आहे. त्यामुळे आजही त्याच संस्थांकडून ही सेवा महापालिकेने पुढे कायम ठेवली आहे.

(हेही वाचा बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण; उद्धव ठाकरे अनुपस्थित, राज ठाकरेंची हजेरी)

१८ कोटी रुपये खर्च केले

त्यामुळे जलअभियंता, पाणी पुरवठा प्रकल्प, मुंबई मलनि:सारण प्रकल्प, मलनि:सारण प्रकल्प, मलनि:सारण प्रचालन, यांत्रिकी व विद्युत प्रकल्प, सागरी किनारी रस्ते आदींसाठी १६ जीप, ११२ कार अशाप्रकारे १२८ प्रवाशी वाहन सेवा खासगी संस्थांकडून घेतली जात आहे. पुढील दोन वर्षांसाठी होणाऱ्या प्रवाशी वाहन सेवांसाठी सुमारे १८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यासाठी मल्हार हायरिंग सर्विसेस या संस्थेची निवड करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.