शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आता कठोर पावले उचलण्यात आली आहेत. राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी शिक्षण विभागात लाच घेताना सापडल्यास थेट निलंबित केले जाणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच, संबंधित कर्मचा-यांची खातेनिहाय चौकशी कनिष्ठ पातळीवरुन न करता थेट आयुक्त कार्यालयामार्फत केली जाणार असल्याचेही मांढरे यांनी सांगितले आहे. शिक्षण विभागात होणा-या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सुरज मांढरे म्हणाले.
शिक्षण विभागात भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या सतत आपल्या कानांवर पडत असतात. त्यामुळेच आता शिक्षण विभागातील कर्मचारी लाच घेताना सापडला तर त्याचे थेट निलंबन केले जाणार आहे. तसेच, संबंधित कर्मचा-याची चौकशीदेखील कनिष्ठ पातळीवर न करता आता थेट आयुक्त कार्यालयामार्फत केली जाणार आहे. लाच घेणा-या कर्मचा-यांची खुली चौकशी करण्यासाठी प्रस्तावदेखील पाठवले जाणार असल्याचे सुरज मांढरे यांनी सांगितले. आतापर्यंत 40 अधिका-यांच्या चौकशीचे खुले प्रस्ताव पाठवण्यात आले असल्याची माहिती मांढरे यांनी दिली.
( हेही वाचा: अँटीलिया आणि मनसूख हिरेन प्रकरणाचा NIA ने सखोल अभ्यास केलेला नाही; उच्च न्यायालय )
लाच घेताना आढळल्यास ‘अशी’ होणार कारवाई
- लाच घेताना एखादा कर्मचारी सापडल्यास त्याचे थेट निलंबन होणार.
- तसेच, संबंधित अधिका-याची चौकशी थेट आयुक्त कार्यालयामार्फत होणार.
- लाच घेताना सापडलेल्या कर्मचा-यांची खुली चौकशी केली जावी, यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे शिफारस केली जाणार.