मुंबईच्या सुशोभीकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सुशोभीकरणाच्या नावाखाली काय केले हेच कळत नाही. मुंबईत खांबावर लाईट लावले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी मुंबई आहे की डान्सबार कळत नाही, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते.
राजकारण्यांकडून व्हिजन घेण्याऐवजी त्यांना व्हिजन देण्याची गरज
शिक्षणाचे तेच झाले, तेच वैद्यकीय परिस्थितीचे, सगळ्याचा विचका झाला आहे. त्या सगळ्या गोष्टींचा लोड हा शहरांवर येतो आणि शहरांवर आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त पैसे खर्च आता मेट्रो बांधले जातात आणि आपण बेसुमार फक्त खर्च करतो. महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये, बाकीच्या ठिकाणी देखील अशीच परिस्थिती असेल. कदाचित इतर शहरांमध्ये ठाण्यामध्ये पुण्यामध्ये जाऊ शकत नाही असे रस्ते आहेत. आपण या गोष्टीचा विचार करत नाही आहोत एखादी गाडी घेतली तर गाडी पार्क कुठे होणार आहे याचा विचार करत नाही. टू व्हीलर विकल्या जात आहेत, फोर व्हीलर विकल्या जातात, कुठे पार्क केले जातात माहिती नाही. सरकार सरकारच्या पद्धतीने काम करतंय मग सरकारला काय वाटते हेच ठरत नाही, असेही राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्राच्या राजकारणाचा बकालपणा झाला आहे. जो चिखल झाला आहे, त्याचे काय? राजकारण्यांकडून व्हिजन घेण्याऐवजी त्यांना व्हिजन देण्याची गरज आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community