दौंड हादरले! आत्महत्या की घातपात? भीमा नदीत आढळले एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह

191

दौंड तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा नदीत ७ जणांचे मृतदेह सापडले आहेत. पारगाव येथील भीमा नदी पात्रात सोमवारी एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह सापडले होते. त्यानंतर मंगळवारी २४ जानेवारी रोजी दुपारी १ नंतर या नदीपात्रात पुन्हा तीन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत. या सर्व मृतदेहांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे.

( हेही वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! राज्याने विमा योजनेत केला मोठा बदल )

एकाच घरातील ७ जणांचे मृतदेह 

यात मोहन उत्तम पवार (अंदाजे वय ५० वर्षे) संगीता मोहन पवार (अंदाजे वय ४५ वर्षे, दोघे रा.खामगांव ता.गेवराई) त्यांचे जावई शामराव पंडित फुलवरे (अंदाजे वय ३२ वर्षे) त्यांची पत्नी राणी शामराव फुलवरे (अंदाजे वय २७ वर्षे) शामराव फुलवरे यांचा मुलगा रितेश शामराव फुलवरे (वय ७ वर्षे) छोटू शामराव फुलवरे (वय ५ वर्षे) आणि कृष्णा (वय ३ वर्षे) असे एकूण एकाच घरातील ७ जणांचे मृतदेह या नदीपात्रात आढळून आले आहेत.

हा अपघात आहे, घातपात आहे की आत्महत्या हे समजू शकलेले नाही. एकाच कुटुंबातील ७ लोकांचे मृतदेह आढळल्याने संपूर्ण दौंड तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून लवकरत पोलीस तपासात सर्व माहिती उघड होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.