मुंबई विमानतळावरील सर्व्हर बुधवारी पुन्हा एकदा ठप्प झाल्याचा फटका प्रवाशांना बसला. 26 जानेवारीपासून सुट्टीचा वीकेंड असल्यामुळे विमानतळावर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी होती. मात्र, सर्व्हर ठप्प झाल्याने संगणकीय कामे सुमारे अर्धा तास बंद पडली होती. परिणामी, विविध विमान कंपन्यांच्या काऊंटवर प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे, केवळ मुंबई विमानतळच नव्हे तर देशातली अनेक विमानतळांवरली सर्व्हर ठप्प झाल्याचे समजते. मात्र, केवळ मुंबई विमानतळच नव्हे काही काळासाठी सर्व्हर ठप्प झाल्याचे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले. तर देशातील उर्वरित ठिकाणी सर्व्हर ठप्प न झाल्याची प्रतिक्रिया दिली.
( हेही वाचा: लाचलुचपतच्या १८ प्रकरणांमध्ये महापालिकेच्या स्तरावर कार्यवाही )
याआधीही सेवा झालीय ठप्प
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी एकच्या दरम्यान मुंबई विमानतळावरील संगणकांना जोडणारी सर्व्हर प्रणाली हॅंग झाल्यामुळे संगणकीय सेवा बंद पडली होती. टर्मिनल-1 वर प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागल्या. गेल्या दीड महिन्यांत सर्व्हर बंद पडल्याची ही दुसरी घटना आहे. 1 डिसेंबर रोजी मुंबई विमानतळावरील टर्मिनल-2 वरील सर्व्हर सेवा ठप्प झाली होती.
Join Our WhatsApp Community