Republic day 2023: प्रजासत्ताक दिनानिमित्त दादरच्या समुद्र किनारी महिलांचे मॅरेनॉथ, मिलिंद सोमणने दाखवला हिरवा झेंडा

156

संपूर्ण देशभरात गुरुवारी, २६ जानेवारीला ७४व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. या दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली होती आणि भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. त्यामुळे हा दिवस साजरा करण्यासाठी गुरुवारी देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. मुंबईतील दादर चौपाटीच्या किनारी महिलांच्या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनला मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमणकडून हिरवा झेंडा दाखवला गेला.

विशेष म्हणजे पहाटे पहाटे दादरच्या समुद्र किनारी साड्या नेसून महिलांनी या मॅरेनॉथमध्ये सहभाग घेतला. यावेळी महिलांचा उत्साह पाहण्या जोगा होता. या मॅरेनॉथला हिरवा झेंडा दाखवणार मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाला की, ‘जेव्हा आपण व्यायामाबाबत विचार करतो, तेव्हा खासकरून महिला आपण फिट कपडे घालू शकत नाही, शॉट कपडे घालू शकत नाही, त्यामुळे व्यायाम करू शकत नाही, असा विचार करतात. अशा महिलांना दाखवून देण्यासाठी की, साडीतही व्यायाम केला जाऊ शकतो. त्यामुळे मॅरेथॉनमध्ये महिला साड्या नेसून आल्या आहेत. उत्तम उदाहरण म्हणजे राणी लक्ष्मी बाई यांचे. त्यांनी साडी नेसून घोड्यावर बसून ब्रिटिशांचा सामना केला होता.’

(हेही वाचा – अनोखा प्रजासत्ताक दिन; ३७००हून अधिक विद्यार्थ्यांनी साकारली महापुरुषांची मानवी प्रतिकृती)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.