देशाच्या ७४व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day 2023) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गुरुवारी, २६ जानेवारीला खास पेहरावत दिसून आले. भारताच्या विविधतेचे प्रतीक असलेली बहुरंगी राजस्थानी पगडी मोदींनी घातली होती. यंदाच्या पंतप्रधान मोदींच्या पोशाखाची झलक तेव्हा झाली जेव्हा ते प्रजासत्ताक दिनाच्या परेडपूर्वी नॅशनल वॉर मेमोरिअल (National War Memorial) येथे पोहोचले होते. पांढरा कुर्ता आणि काळ्या कोटसोबत पँट घालून पंतप्रधान मोदींनी पांढरी शॉल घेतली होती.
#RepublicDay | PM Modi leads the nation in paying homage to the fallen soldiers at the National War Memorial in Delhi pic.twitter.com/CE9B2CPZmB
— ANI (@ANI) January 26, 2023
गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींच्या पोशाखाला उत्तराखंड आणि मणिपूरचा एक वेगळा स्पर्श होता. उत्तराखंडची ब्रह्मकमळ टोपी आणि मणिपुरचा लीरम फी स्टोल घेतला होता. दरवर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्ताने मोदींनी परिधान केलेल्या पोशाखाची चर्चा होते. इतर प्रसंगीही विशिष्ट जमाती किंवा प्रदेशाचे पारंपारिक कपडे मोदी परिधान करतात.
यंदाच्या ७४व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सीसी उपस्थित राहिले आहेत. काही तासांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रमुख पाहुण्याचे कर्तव्यपथावर स्वागत केले. यावेळी पंतप्रधानांकडून संरक्षण मंत्री, संरक्षण राज्यमंत्री, चिफ ऑफ डिफेन्स, तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख आणि संरक्षण सचिव यांचा परिचय करून देण्यात आला.
(हेही वाचा – Republic day 2023: प्रजासत्ताक दिनानिमित्त दादरच्या समुद्र किनारी महिलांचे मॅरेनॉथ, मिलिंद सोमणने दाखवला हिरवा झेंडा)
Join Our WhatsApp Community