प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day 2023) दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सादर करण्यात आला. यावर्षीच्या पथसंचलनात १७ राज्ये आणि १० विविध केंद्रीय मंत्रालयांनी मिळून १७ चित्ररथ कर्तव्यपथावर सादर केले.
महाराष्ट्राने यापूर्वी ४० वेळा राजधानी दिल्लीत मुख्य पथसंचलनात चित्ररथ सादर केलेला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यावेळी “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” ही संकल्पना सादर केली आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या पुढील दर्शनीय भागात गोंधळी संबळ वाद्य वाजवित असल्याची मोठी प्रतिकृती होती. समोरच्या डाव्या आणि उजव्या भागास पारंपरिक वाद्य वाजविणारे आराधी, गोंधळी यांच्या प्रतिमा आहेत. त्यामागे शक्तिपीठांची मंदिरे असून त्यात देवींच्या प्रतिमा आहेत. मागच्या बाजूस पोतराज आणि हलगी वाजविणाऱ्या भक्तांची मोठी प्रतिकृती आहे. तर मधल्या जागेत लोककलाकार आराधी, पोतराज हे लोककला सादर करणार आहेत. तर शेवटी मागच्या बाजूस नारी शक्तीचे प्रतिनिधीत्व करणारी एक मोठी स्त्रीप्रतिमा दिसत होती.
Tableau of Maharashtra on #RepublicDay parade today. Based on "ShaktiPeeth". Maharashtra will showcase 3 & half Shaktipeeths. These 3 & half Shaktipeeths include Mahalakshmi Temple of #Kolhapur, Sri Kshetra Tuljapur of Tuljabhavani, Renukadevi of Mahur & Saptshringi Devi of Vani pic.twitter.com/6Qlnh23bFq
— Dayanand Kamble (@dayakamPR) January 26, 2023
या चित्ररथाची संकल्पना सांस्कृतिक कार्य संचालनालयाची आहे. ‘शुभ ॲड’ या संस्थेने चित्ररथाला मूर्त स्वरुप देण्याचे काम केले. तसेच संगीतकार कौशल इनामदार यांनी चित्ररथात साडेतीन शक्तीपीठांचा महिमा सांगणारे गीत संगीतबद्ध केले आहे. तर प्राची गडकरी यांनी हे गीत लिहिले. दरम्यान ‘व्हिजनरी परफॉर्मिंग कला समूह’, या संस्थेच्या कलाकारांनी या चित्ररथावर नृत्य कला सादर केली. या गाण्यातील काही कडव्यांचे राजधानी दिल्लीत कर्तव्यपदावरील पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथा बरोबर अनेक कलाकारांनी सादरीकरण केले.
(हेही वाचा – Republic day 2023: प्रजासत्ताक दिनानिमित्त दादरच्या समुद्र किनारी महिलांचे मॅरेनॉथ, मिलिंद सोमणने दाखवला हिरवा…)
Join Our WhatsApp Community