काही महिन्यांपूर्वी जुलै २०२२ला शिवसेना पक्षात फूट पडली आणि त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना झाली. त्या दिवसापासून महाविकास आघाडीतील पक्षात गळती सुरू झाली ती अजूनही सुरुच आहे. मविआतील तिन्ही पक्षातील नेते कधी भाजपात प्रवेश करतायत, तर कधी शिंदे गटात प्रवेश करतायत. आता परभणी आणि पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठं भगदाड पडण्याचं चिन्ह दिसतं आहे. कारण परभणीतील शरद पवारांचे निकटवर्तीय असलेले आमदार आणि पुण्यातील राष्ट्रवादीचे १२ नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वी परभणी जिल्ह्यातील ४० सरपंचांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर शिंदे गटाचे नेते सईद खान यांनी शरद पवार यांचे निकटवर्ती असलेले आमदार बाबाजानी दुर्राणी शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे सध्या परभणीच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.
तसंच दुसरीकडे पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांची जय्यत तयारी सुरू असतानाचं राष्ट्रवादीतील नेते शिंदे गटाचा मागावर आहेत, असं समोर आलं आहे. माहितीनुसार राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला पुणे इंद्रापूरातील १२ माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणात आहेत. पण या इन्कमिंगमुळे येत्या काळात शिंदे गटाचं बळं वाटणार असल्याचं दिसून येत आहे.
(हेही वाचा – देवेंद्र फडणवीस-अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी; जयंत पाटलांचं खळबळजनक वक्तव्य)
Join Our WhatsApp Community