बाळासाहेब यांचा वारसा गेला आहे. आता त्यांनी काँग्रेसचा वारसा घेतला आहे. उद्धव ठाकरे स्वतः मिंधे झाले आहेत हे पाहायला मिळत आहे. शक्तिप्रदर्शन केल्याशिवाय आता उद्धव ठाकरे काहीही करू शकत नाहीत असा हल्लाबोल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला.
हिंदुत्वापासून दूर व्हा हे कधीही बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही सांगितले नाही, शिवसेना आणि भाजपची युती ही बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केली आहे. दरम्यान, आरोप करताना आदित्य ठाकरे यांनी संयम बाळगला पाहिजे. कारण ते स्वतःला आणि ठाकरे घराण्याला डॅमेज करत आहेत ते त्यांनी थांबवावे असेही मंत्री केसरकर म्हणाले. केसरकर यांनी पहाटेच्या शपथविधीवर बोलण्यावर टाळले.
कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी 70 कोटी
दरम्यान, कोल्हापूर हा महाराष्ट्रातील आणि देशातील पहिला जिल्हा होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, कोल्हापूरचं वैभव वाढलं पाहिजे त्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. पंचगंगा प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. अंबाबाई मंदिर परिसरात सुविधा देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कोल्हापूर शहरातील रस्त्यांची महापूर व अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा नियोजन समितीकडून रस्ते दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाला तत्काळ 10 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. संपूर्ण शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व काही ठिकाणी नवीन रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून 70 कोटीचा निधी मंजूर केला आहे. यामुळे नागरिकांना चांगले व उत्कृष्ट रस्ते वाहतुकीसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती पालकमंत्री केसरकर यांनी दिली.
Join Our WhatsApp Community