शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत, या प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीत ठिणगी पडली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वक्तव्याला विरोध केला जात आहेत. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील जरा जपून शब्द वापरावे, अशा प्रकाश आंबेडकरांना सल्ला दिला आहे. पण हाच सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला असता तर मानला असता, असे प्रत्युत्तर प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे.
शुक्रवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘आमची युती ही शिवसेनेसोबत आहे. उद्धव ठाकरे आम्हाला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडी एमआयएमसोबत युती करणार नाही.’ पुढे राऊतांनी दिलेल्या सल्ल्याबाबत आंबेडकर म्हणाले की, ‘जपून बोलण्याचा सल्ला जर उद्धव ठाकरेंनी दिला असता तर मानला असता.’
शरद पवारांच्या विधानाबाबत काय म्हणाले आंबेडकर?
शरद पवारांसंबंधित केलेल्या विधानाबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘मी ते विधान इतिहासामधील काही घटनांवरून केले होते. सद्यपरिस्थितीशी त्याचा काहीही संबंध नाही. जर कोणी त्या विधानाला चुकीच्या पद्धतीने घेत असेल तर मी त्याला काही करू शकत नाही.’
काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?
प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांनी मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितले की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचे ठरले होते. मी फक्त पहिला गेलो. २०१९ च्या लोकसभेपूर्वीच हे ठरले होते.
(हेही वाचा – शिवशक्ती-भीमशक्ती युतीशी मविआचा संबंध नाही – नाना पटोले)
Join Our WhatsApp Community