उत्तर प्रदेशात प्रजासत्ताक दिनी फडकला इस्लामिक झेंडा

138

प्रजासत्ताक दिनाला इस्लामिक झेंडा फडकवल्याची घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी मदरशावर फडकवण्यात आलेला झेंडा उतरवून गुन्हा दाखल केलाय.

यासंदर्भात माहिती देताना सुबेहा पोलिस ठाण्याचे अधिकारी संजीव कुमार सोनकर यांनी सांगितले की, बाराबंकी इथल्या सुबेहा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हुसेनाबाद गावातील मदरसा अशरफुल उलूम इमा इमदादिया सकीन येथे प्रजासत्ताक दिनाला ‘इस्लामिक ध्वज’ फडकवण्यात आल्याची तक्रार मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सदर झेंडा उतरवून मदरशात झेंडा फडकवणाऱ्या आसिफ विरोधात गुन्हा दाखल केलाय.

असाच प्रकार बिहारच्या पूर्णियामध्येही घडला. याठिकाणी मधुबनीच्या सिपाही टोला भागात मशिदीच्या शेजारी असलेल्या घराच्या छतावर पाकिस्तानी झेंडा फडकवण्यात आला होता. याबाबत माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन हा झेंडा उतरवण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केल्याचे एसएचओ पवन चौधरी यांनी सांगितले.

(हेही वाचा – Republic day 2023: प्रजासत्ताक दिनानिमित्त दादरच्या समुद्र किनारी महिलांचे मॅरेनॉथ, मिलिंद सोमणने दाखवला हिरवा…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.