मुंबईहून दिल्लीकडे निघालेल्या एका विमान प्रवाशाच्या सामानातून जिवंत काडतुसे आणि मॅगझीन मिळाल्यामुळे विमानतळावर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात या विमान प्रवासी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळ काडतुसे आणि मॅगझीन कुठून आले याबाबत त्याने पोलिसांकडे अद्याप खुलासा केलेला नसल्यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे.
एक पिस्तूलची मॅगेझीन मिळाली
राजेश रस्तोगी (५३) असे विमान प्रवाशाचे नाव आहे, व्यवसायाने इंजिनियर असणारे राजेश रस्तोगी हे नवी मुंबईतील ऐरोली येथे राहणारे आहे. २५ जानेवारी रोजी रस्तोगी हे ‘गो फर्स्ट एअरलाईन्स’ च्या विमानाने दिल्ली येथे जाण्यासाठी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनस १ वर आले होते, त्यांनी सुरक्षा तपासणीसाठी आपली बॅग स्कॅनर मशीनमध्ये टाकली असता. स्कॅन मशीनमध्ये त्याची बॅग तपासली जात असताना, बॅगेत संशयास्पद वस्तू आढळून आले. केंद्रीय सुरक्षा दलाच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांची बॅग मशीनमधून बाहेर काढून तपासली असता बॅगेच्या आतील कप्प्यात ७.६५ के.एफ चे ६ जिवंत काडतुसे आणि एक पिस्तूलची मॅगेझीन मिळाली आहे. त्याच्या इतर सामानाची कसून तपासणी केली, मात्र रस्तोगी यांच्याकडे पिस्तूल आढळून आले नाही.
(हेही वाचा २०२२मध्ये FASTag द्वारे ५० हजार ८५५ कोटींची वसुली; ४६ टक्क्यांनी झाली वाढ)
रस्तोगी यांना अटक करण्यात आली
रस्तोगी यांच्याकडे चौकशी केली असता ते सुरक्षा अधिकारी यांना समाधानकारक देऊ न शकल्याने केंद्रीय सुरक्षा दलाने विमानतळ पोलीस ठाण्यात राजेश रस्तोगी याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी राजेश रस्तोगी यांच्या विरुद्ध शस्त्र अधिनियम कायदा कलम २५ आणि ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून रस्तोगी यांना अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे पोलिस काडतूसाबाबत चौकशी केली असता त्याने याबाबत अद्याप खुलासा केला नसल्यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिक वाढले आहे.
Join Our WhatsApp Community