आर्थर रोड तुरुंगातील कैद्याकडे सापडला सोन्याचा पट्टा

157

मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात आणण्यात आलेल्या एका कैद्याच्या कमरेला सोन्याचा कस आलेला पट्टा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सोन्याच्या पट्ट्याचे वजन ७३० ग्रॅम असल्याची माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनी दिली.

( हेही वाचा : विद्यापीठांना दत्तक घ्यावे लागणार पर्यटनस्थळ! देशाचा समृद्ध वारसा, संस्कृतीची माहिती देण्यासाठी विशेष उपक्रम)

सीमा शुल्क विभागाने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका तस्कराला सोनं तस्करी प्रकरणी अटक केली होती. त्याच्या जवळून सीमा शुल्क विभागाने मोठ्या प्रमाणात सोनं जप्त केले, मात्र त्याने सोन्याच्या कस पासून तयार केलेला पेस्टचा पट्टा पँटच्या कमरेच्या आत दडवून ठेवला होता, हा पट्टा सीमा शुल्क विभागाला अंग झडतीत सापडला नाही.

दरम्यान सीमाशुल्क विभागाने या तस्कराला न्यायालयात हजर केले आणि न्यायालयाने त्याची रवानगी तुरुंगात केली. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तस्कराला मुंबई मद्यवर्ती कारागृह (आर्थर रोड तुरुंग) या ठिकाणी तुरुंगाधिकाऱ्यांच्या ताब्यात देऊन त्याची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केली. नवीन न्यायबंदीला तुरुंगात टाकण्यापूर्वी काही प्रक्रियातून जावे लागते, त्यापैकी एक प्रक्रिया म्हणजे संपूर्ण विवस्त्र होऊन त्याची झडती घेतली जाते, त्यानंतर त्याने काढलेले कपडे बारकाईने तपासले जातात, कारण न्यायबंदीकडून तुरुंगात कुठलीही आक्षेपार्ह वस्तू जाऊ नये याची काळजी तुरुंग प्रशासनाकडून घेतली जाते.

सीमा शुल्क विभागाने अटक केलेल्या तस्कराची अंगझडती आणि त्याच्या कपड्याची तपासणी सुरू असताना तुरुंगातील हवालदार अनिल इंगळे यांना या न्यायबंदीच्या जीन्स पॅन्टच्या लूपमध्ये संशयास्पद वस्तू आढळली. इंगळे यांनी पॅन्टची पूर्ण लूप उलगडून त्यात दडवलेली वस्तू बाहेर काढली असता, सोन्याच्या कसच्या पेस्ट पासून तयार केलेला पट्टा सापडला. इंगळे यांनी ही बाब अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली, तुरुंग प्रशासनाने हा पट्टा ताब्यात घेऊन त्याचे वजन केले असता सोन्याचा कस असलेल्या या पट्ट्याचे वजन ७३० ग्रॅम असल्याचे तपासात समोर आले. तुरुंग प्रशासनाने ही सीमा शुल्क विभागाच्या लक्षात आणून दिली असून या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.