महाराष्ट्र आणि कर्नाटकात ईडीने मोठी छापेमारी केली असून तब्बल ७० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आयकर परताव्या संदर्भात केलेल्या कोट्यावधींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीने पुणे, लोणावळा, खंडाळा, कर्जत तसेच कर्नाटकातील उडुपी येथील जमिनी जप्त केल्या आहेत. त्याचप्रमाणे BMW, मर्सिडिज, आणि ऑडीसारख्या आलिशान गाड्या आणि मुंबई-पनवेल याठिकाणी असलेले फ्लॅट अशी एकूण ६९.९५ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.
( हेही वाचा : NCC स्थापनेचे ७५ वे वर्ष! पंतप्रधान मोदी जारी करणार ७५ रुपयांचे स्मृती नाणे )
वरिष्ठ कर सहाय्यकावर कारवाई
आयकर खात्याचे वरीष्ठ कर सहाय्यक तानाजी मंडल आणि इतरांनी आयकर विभागाकडून बोगस मार्गाने उपलब्ध झालेल्या २६३ कोटी रुपयांचा परतावा वैयक्तिक बॅंक खात्यात वळवल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे.
तानाजी मंडल हे ईडीचे वरीष्ठ कर सहाय्यक अधिकारी असून यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. आयकर परतावा (टीडीएस) घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे. यासाठी त्यांनी आपल्या वरिष्ठांच्या लॉगिन आयडीचा वापर केला याद्वारे जे खोटे टीडीएस रिटर्न क्लेम करण्यात आले होते ते रिटर्न्स मंडल यांनी आपल्या नावावर करून घेतले. यासाठी मंडल यांच्यावर ईडीने ही कारवाई केली आहे.
Join Our WhatsApp Community