पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली भारताने अवघ्या दोन वर्षांत चार स्वदेशी लसी विकसित केल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातील जैवतंत्रज्ञान विभागाने (DBT) “मिशन कोविड सुरक्षा” च्या माध्यमातून, चार लसी वितरित केल्या आहेत, कोवॅक्सिनच्या उत्पादनात वाढ केली आहे तसेच भविष्यातील लसींच्या सुरळीत विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत, यामुळे आपला देश महामारीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे, असे ते म्हणाले. या लसी विविध संस्थांच्या सहकार्याने विकसित करण्यात आल्या आहेत.
( हेही वाचा : मध्य रेल्वेच्या ‘या’ स्थानकांदरम्यान मध्यरात्री विशेष पॉवरब्लॉक!)
या आहेत ४ लसी –
- ZyCoV-D- जगातील पहिली आणि भारताची स्वदेशात विकसित डीएनए लस.
- CORBEVAXTM- भारताची पहिली प्रोटीन सबयुनिट लस.
- GEMCOVAC™-19 – जगातील पहिली आणि भारताची स्वदेशात विकसित.
- mRNA लस आणि iNCOVACC – जगातील पहिली आणि भारताची स्वदेशात विकसित नाकावाटे घेण्याची कोविड-19 प्रतिबंधक लस.
भारत सरकारने आत्मनिर्भर भारत 3.0 पॅकेज अंतर्गत सुमारे 900 कोटी रुपयांचा निधी “मिशन कोविड सुरक्षा” साठी घोषित केल्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केले. सुरक्षित, परिणामकारक, परवडणाऱ्या आणि स्वदेशी कोविड-19 लसींचा वेगवान रीतीने विकास करणे हा यामागचा उद्देश होता, असे मंत्र्यांनी नमूद केले.
Join Our WhatsApp Community