तब्बल ५३ टक्के लोक म्हणतात, देशात ‘लव्ह जिहाद’ सुरु आहे!

209

देशात वाढत्या लव्ह जिहादच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वेक्षण करण्यात आले, त्यासाठी देशभरातील १ लाख ४० हजार नागरिकांची मते जाणून घेण्यात आली, त्यानुसार 53 टक्के लोकांनी मुसलमान पुरुष हे लव्ह जिहादमध्ये सहभागी असतात, असे मत मांडले आहे.

लव्ह जिहादमध्ये फसलेल्या हिंदू मुलींचे आयुष्य बनते शापित 

इंडिया टुडे-सीव्होटर यांनी ‘मूड ऑफ द नेशन’ अंतर्गत एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात लव्ह जिहादबाबत लोकांची मते जाणून घेण्यात आली. सर्वेक्षणात देशभरातील १,४०,९१७ (एक लाख ४० हजार ९१७) लोकांना प्रश्न विचारण्यात आले. एवढेच नाही तर सी व्होटरने 1,05,008 (1 लाख 5 हजार 8) नागरिकांच्या मुलाखतींचे विश्लेषणही केले आहे. सर्वेक्षणानंतर जाहीर झालेल्या अहवालात म्हटले आहे की, सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 53% लोकांचे म्हणणे आहे की, मुस्लिम तरुण हे लव्ह जिहादमध्ये सहभागी आहेत. लव्ह जिहादसाठी मुस्लिमांकडून हिंदू मुलींना लक्ष्य केले जाते. यासाठी मुस्लिम तरुण आपले नाव आणि धर्म लपवून मुलींशी मैत्री करतात. मग ते हिंदू मुलींना त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. यानंतर हिंदू मुलींना धर्मांतर करण्यास भाग पाडले जाते. एवढेच नाही तर त्यांना बलात्कार, मारहाण सारख्या घटनांनाही सामोरे जावे लागते. मात्र, यानंतरही त्याचे आयुष्य शापित बनते. कारण, बहुतेक प्रकरणांमध्ये एकतर मुस्लिम सोडून देतात किंवा हिंदू मुलींना मारतात. डावे, उदारमतवादी आणि तथाकथित बुद्धीवादी आणि इस्लामी धर्मगुरुंनी नेहमीच लव्ह जिहादला एक काल्पनिक गोष्ट म्हटले आहे हे विशेष. मात्र, हा अहवालात लव्ह जिहाद ही काल्पनिक कथा नसून इस्लामवाद्यांचे वास्तव असल्याची पुष्टी करतो. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि कर्नाटकसह अनेक राज्यांनी लव्ह जिहादच्या गंभीर धोक्याचा सामना करण्यासाठी कठोर कायदे केले आहेत.

(हेही वाचा मविआने मालाडच्या उद्यानाला दिलेले टिपू सुलतानाचे नाव काढण्याचे आदेश)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.