सत्यजित तांबेंचा दावा; काँग्रेसचे सर्व पदाधिकारी राजीनामा देणार होते

159
नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत असलेले सत्यजित तांबे यांनी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी राजीनामा दिला. त्या पार्श्वभूमीवर तांबे यांनी खरे तर महाराष्ट्रात अनेक पदाधिकारी राजीनामा देणार होते. मी प्रत्येकाला सांगितले कुणीही राजीनामा देण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाने आपापले काम करावे. आपण पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. मागील १०० वर्ष कुटुंबाने काँग्रेस पक्षासोबत काम केले आहे. त्यामुळे कुठेही काहीही निर्णय घेता कामा नये. राजकारण राजकारणाच्या पद्धतीने होत राहील. जेव्हा वेळ येईल तेव्हा सविस्तर यावर विषयावर बोलूच असा निरोप राज्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांना दिला असा दावा नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवार सत्यजित तांबे यांनी केला.

काय म्हणाले सत्यजित तांबे? 

सगळ्याच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पाठिशी आहेत. डॉ. तांबेची निवडणूक आल्यावर सगळेच एकत्रित येतात. आम्ही आणि आमच्या कुटुंबाने कधीही पक्षीय, जातीय आणि धार्मिक भेद पाहिले नाहीत. जो येईल त्या माणसाची मदत करण्याची भूमिका कुटुंबाने घेतली. सगळे आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. २२ वर्ष संघटनेच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक जीवनात काम करत आहे. २००० साली NSUI च्या माध्यमातून मी पक्षीय राजकारणाला सुरूवात केली. राज्याचा युवक अध्यक्ष म्हणून काम केले. मी देशातील प्रत्येक राज्यात काँग्रेसच्या कामासाठी गेलो असेल. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेस वाढवण्याचे काम करत आलो आहे. त्यामुळे माझ्यावर प्रेम करणारे कडवट कार्यकर्ते होते त्यांचे विचार होते, नवी पिढी पुढे यायला हवी. मोठ्या व्यासपीठावर हे काम मांडण्याची गरज आहे. त्यातून या निवडणुकीत उभा राहिलो असे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.