नेपाळमधील 6 कोटी वर्षे प्राचीन शिळांपासून बनविणार अयोध्येतील श्रीरामाची मुर्ती

153

नेपाळहून दोन शाळिग्राम शिळा अयोध्येत आणल्या जात आहेत. रामजन्मभूमीवर बांधण्यात येणा-या मंदिरात भगवान श्रीराम व सीता यांच्या मूर्ती या शिळांतून घडवण्यात येतील. शिळा सुमारे 6 कोटी वर्षे प्राचीन असल्याचा दावा आहे. त्यांच्यापासून बनवलेल्या मूर्तींची राममंदिरातील गर्भगृहात किंवा मंदिर परिसरात कुठे प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय श्रीराम मंदिर ट्रस्टने अद्याप घेतलेला नाही. दोन शिळांचे एकूण वजन 40 टन आहे. नेपाळमधील पोखरी येथील शालिग्राम नदातून या दोन शिळा भूगर्भतज्ज्ञ तसेच पुरातत्वतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आल्या.

शिळा 6 कोटी वर्षे जुन्या

राम मंदिर ट्रस्ट्रचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांनी सांगितले की, शिळा अयोध्येत पोहोचल्यानंतर ट्र्स्ट आपले काम करेल. या शिळा 2 फेब्रुवारीला अयोध्येत पोहोचणार आहे. त्या शिळा तब्बल 6 कोटी वर्षे जुन्या आहेत.

काय आहे इतिहास?

नेपाळची शालिग्राम नदी भारतात प्रवेश करताच नारायणी बनते. तिला बुढी गंडकी नदी म्हणतात. या नदीच्या काळ्या शिळांची भगवान शालिग्राम यांची पूजा केली जाते. शालिग्राम नदीतच शालिग्राम शिळा सापडते. ही नदी दामोदर कुंडातून उगम पावते आणि बिहारमधील सोनेपूर येथे गंगा नदीला मिळते. नदीच्या पात्रातून शिळा काढण्यापूर्वी धार्मिक विधी झाला. नदीची माफी मागितली गेली. विशेष पूजा केली गेली. नेपाळमधील गाळेश्वर महादेव मंदिरात 26 जानेवारीला शिळांचा रुद्राभिषेकही केला.

रामजन्मभूमीचे जुने मंदिर

शालिग्रामी शिळा खूप मजबूत आहेत. त्यामुळे कारागीर बारीकसारीक गोष्टी करत आहेत. अयोध्येतील रामाची धूसर मूर्ती अशा प्रकारच्या शिळेवर कोरलेली आहे. रामजन्मभूमीच्या जुन्या मंदिरातील कसौटीचे अनेक खांब यापासून बनवलेले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.