सोलापुरात उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा फुटला आहे. या कालव्यातून 500 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु होता. या पाण्यामुळे मोहोळ तालुक्यातील पाटकुल या गावातील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. ऊस, द्राक्ष, डाळिंबांच्या बागांचे तसेच इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांतही कालव्याचे पाणी शिरले आहे. अजूनही पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यामुळे शेतातील मातीही खरडवून जात आहे. शेकडो एकर शेतामध्ये पाणी साचले आहे. प्रशासनाकडून तत्काळ पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतक-यांना भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
( हेही वाचा: गोव्यात जाऊन फोटो काढताय? तर सावधान; आधी ही बातमी वाचाच)
शेकडो एकर क्षेत्र पाण्याखाली
उजनी धरणाचा उजवा कालवा फुटल्याने शेतक-यांच्या शेतात पाणी शिरुन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाटकुल येथील शेतक-यांना मोठा फटका बसला आहे. उजनी धरणातून येणारा उजनी कालवा 112 किमीचा आहे. रविवारी पहाटे पाटकुल ओढ्याजवळ हा कालवा फुटला असून, त्यामुळे शेतक-यांच्या उभ्या पिकांसह विहिरींचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. शेकडो एकर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे.
Join Our WhatsApp Community