नोकरदारवर्गासाठी आणि घरापासून दूर बाहेरगावी गेलेल्या कर्मचा-यांसाठी बाहेरुन नाष्टा पाणी घेण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु आता तुम्हाला त्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. सर्वसामान्यांसाठीचा नाष्टा आता महागला आहे. पोह्यांच्या दरात क्विंटलला 200 ते 300 रुपयांची दरवाढ झाली आहे. त्यातून सध्या कच्च्या मालाचा तुटवडा पाहायला मिळतो आहे आणि उत्पादन खर्चातही वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नाष्टा चालकांनी नाष्ट्याचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
किती दर वाढले?
मागच्या दोन तीन दिवसांत पोहे प्रति किलो 5 रुपयांनी महागले, तर शेंगदाण्यांच्या किमतीत प्रति किलो 20 रुपये तर जि-याचे दरही वाढले आहेत. त्यामुळे आता सकाळचा नाष्टाही सर्वसामान्य जनतेच्या परवडण्यापलिकडे जात असून गृहिणींच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडणार आहे.
( हेही वाचा: उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा फुटला; शेकडो एकर शेती पाण्यात )
दरवाधीचे सत्र सुरुच
गेल्या वर्षभरापासून जीवनावश्यक वस्तू, खाद्यान्नाच्या किमतीत दिवसेंदिवस दरवाढीचे सत्र सुरुच आहे. गेल्या वर्षी सुरु झालेल्या रशिया- युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले होते. पण, सध्या तेलाचे भाव कमी होत आहेत.