सिद्धिविनायक मंदिर प्रकरण: मनसेचे बांदेकरांना थेट आव्हान; ‘हिंमत असेल तर…

202

मागच्या काही दिवसांपासून सिद्धिविनायक मंदिराचा विषय राज्यात चांगलाच गाजत आहे. सिद्धिविनायक मंदिरात घोटाळा झाल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी आदेश बांदेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते . त्यानंतर एक ट्वीट करत बांदेकर यांनी या प्रकरणावर उत्तर दिले. आता याच मुद्द्यावरुन यशवंत किल्लेदार यांनी ट्विट करत बांदेकर यांना थेट आव्हानच दिले आहे.

यशवंत किल्लेदारांचे ट्वीट काय?

नाटकं पुरे झाली आता थेट आव्हान स्वीकारा. आपणास एक ऑडिओ क्लीप ऐकवतो तेसुद्धा सिद्धीविनायक बाप्पाच्या गाभा-यामध्ये. आपण कसा अध्यक्ष पदाचा वापर करुन मोठ्या देणगीदारांकडून टक्केवारीसाठी कंत्राटे मिळवून देता ते थेट ऐकवतो, असा गंभीर आरोप किल्लेदार यांनी ट्वीट करत केला आहे.

हिंमत असेल तर आव्हान स्वीकारा

मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी एकमागून एक ट्वीट करत, बांदेकरांना आव्हान दिले आहे. ठिकाण- सिद्धिविनायक बाप्पा मंदिर गाभारा. वेळ- बांदेकर आपण वेळ आणि तारीख द्या. मुद्दा नियमबाह्य कामाबाबत आक्षेपाचा आहे तो ही पुराव्यासकट, त्यावर बोला. असेल हिंमत तर आव्हान स्वीकारा काय ते एकदाच होऊ दे, असे किल्लेदार यांनी ट्वीट करत म्हटले आहे.

( हेही वाचा: ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा किशोर दास यांचे निधन, पोलीस अधिकाऱ्याने केला होता गोळीबार )

 

तुमच्या पापात बाप्पाला ओढू नका

सिद्धिविनायक मंदिर म्हणजे आदेश बांदेकर नव्हे, हे लक्षात ठेवा उगाच तुम्ही केलेल्या पापमध्ये बाप्पाला ओढू नका, अध्यक्ष म्हणजे देवस्थान नव्हे , असा टोलाही किल्लेदार यांनी लगावला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.