काही दिवसांपासून एका महिला सहप्रवासी व्यक्तीवर लघुशंका केल्याप्रकरणी डीजीसीएनं (DGCA) एअर इंडिया कंपनीवर ३० लाखांच्या दंडासह संबंधित पायलटचं लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित केलं होतं. या कारवाईनंतर आता एअर इंडियानं मोठं पाऊल उचललं आहे. सर्व प्रवाशांच्या हालचालींवर स्वतः एअर इंडिया आता सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लक्ष ठेवणार आहे.
माहितीनुसार, विमानात कोणत्याही प्रकारची घटना घडल्यास, क्रू आणि पायलट सर्व काही सॉफ्टवेअरद्वारे अपलोड करतील, जेणेकरून एअर इंडियाच्या सर्व कनिष्ठ-वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती असेल.
तसंच एअर इंडिया काही दिवसात आपल्या क्रू आणि पायलटना आयपॅड देईल. १ मेपासून विमानात घडणाऱ्या सर्व गोष्टी अपलोड त्यात केल्या जातील. यापूर्वी सर्व घटना पेपरमध्ये लिहिल्या जायच्या. यामुळे कारवाई व्हायला वेळ लागत असे. तसंच प्रत्येकाला माहितीही मिळत नसे.
लघुशंका प्रकरण?
२६ नोव्हेंबर २०२२ रोजी एअर इंडियाच्या विमानात आपल्या सहप्रवाशी महिलेवर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शंकर मिश्रा यानं लघवी केली होती. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलं होत.
(हेही वाचा – लँडिंगपूर्वीच इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशावर गुन्हा दाखल)
Join Our WhatsApp Community