अंधेरीच्या कब्रस्तानात कपड्यात गुंडाळलेल्या बालकाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मृत मुलाची ओळख पटलेली नसून हे मुलं कब्रस्तान मध्ये कोण ठेवून गेले याचा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी डी.एन.नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
अंधेरी पश्चिम वर्सोवा येथील चार बंगला कब्रस्तानात पांढऱ्या कपड्यात गुंडाळून ठेवलेले पुरुष जातीचे मुलं डी.एन.नगर पोलिसांना शनिवारी सापडले. पोलिसांनी या मुलाला कूपर रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. नुकतेच जन्मलेले हे मुलं असून त्याला पांढऱ्या कपड्यात गुंडाळून कब्रस्तानच्या आत ठेवण्यात आले होते. याप्रकरणी डी.एन नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड विधान कलम ३१८ (मृतदेहाची गुप्त विल्हेवाट लावून जन्म लपवणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या शोधासाठी कब्रस्तान आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासली जात आहेत. कब्रस्तान मध्ये नवजात अर्भकाचा मृतदेह अथवा नवजात अर्भक ठेवण्याची अशी घटना पहिल्यांदाच घडत असल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच हे मृत मुलं कब्रस्तानात ठेवणाऱ्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.
Join Our WhatsApp Community