घरी सोडण्याच्या बहाण्याने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

151

अकोला शहरातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना अकोला शहरातील सिव्हिल पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी आरोपी आकाश रामचवरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी गजाआड केले आहे.

नक्की काय घडले?

सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उमरी परिसरात एक अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीबरोबर रस्त्याने घरी जात असताना आरोपीने तिला “चल तुला घरी सोडून देतो”, असं म्हणून तिला उमरीतील स्मशानभूमीच्या मागे घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार १५ जानेवारीच्या रात्री घडला होता. दरम्यान या प्रकारानंतर आरोपी तरुणाने अल्पवयीन मुलीला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे अल्पवयीन मुलीने भीतीपोटी हा प्रकार कुठे सांगितला नाही. काही दिवसानंतर मुलीच्या अंगावर तसेच पाठीवर जखमा दिसून आल्या. यासंदर्भात तिच्या आजीने तिला विचारणा केली आणि तिने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला. यानंतर कुटुंबाने पोलीस स्टेशन गाठत आरोपीविरुद्ध तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस करीत आहेत.

(हेही वाचा – लग्नाळू तरुणांनो सावधान! बोगस वधू-वर सूचक मंडळांकडून ‘अशी’ होते फसवणूक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.