गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिरावर हल्ला करणारा आरोपी अहमद मुर्तजा विरोधात एनआयए न्यायालयाने शिक्षेची सुनावणी केली आहे. न्यायालयाने मुर्तजाला फाशीची शिक्षा सुनावल्याचे समोर आले आहे. माहितीनुसार, मुर्तजावर UAPA अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता आणि याला दहशतवादी मानले गेले होते.
दरम्यान सोमवारी सुनावणीसाठी दहशतवादी मुर्तजा अब्बास याला कडक बंदोबस्तात लखनऊमधील एनआयए/एटीएसच्या न्यायालयात आणले गेले होते. एप्रिल २०२२मध्ये मुर्तजाने गोरखनाथ मंदिरावर हल्ला केला होता.
६० दिवसाच्या सुनावणीनंतर शिक्षा जाहीर
शिक्षेची सुनावणी झाल्यानंतर एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार म्हणाले की, ‘६० दिवसांच्या सुनावणीनंतर आज शिक्षा सुनावली आहे. यामध्ये भादंवि कलम १२१ अन्वये फाशीची शिक्षा आणि ३०७ नुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान सुनावणीच्या वेळी सर्व पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले आणि न्यायालयाने हे पुरावे योग्य असल्याचे मान्य केले. यावरूनच पोलिसांचा तपास योग्य असल्याचा दिसून आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी देशाविरोधातील कटाचा पर्दाफाश केला आहे.’
(हेही वाचा – कब्रस्तानात सापडले मृत अर्भक, अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल)
Join Our WhatsApp Community