गोवर तपासणीचे अहवाल विलंबाने येत असल्यामुळे मुंबईतील रुग्णांची मुंबईतील रुग्णांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी पालिका आरोग्य विभागाकडून कमालीची दिरंगाई सुरु आहे. विलंबाने आलेल्या अंदाजे वीस नमुन्यांतील किती रुग्णांना गोवरचे निदान झाले, किती रुग्ण सद्यस्थितीत बरे आहेत याबाबतची माहिती आरोग्य विभागाने अद्याप घेतलेली नाही. मुंबई पालिका आरोग्य विभागाकडून गोवरच्या रुग्णांबाबत शोध घेतला जात नसेल, तर आता राज्य गोवर टास्क फोर्सला पालिका आरोग्य विभागाला स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. अगोदरच गोवरच्या केसेस हाताळण्यात राज्य आरोग्य विभागावर आरोग्यमंत्र्यांची नाराजी असताना पालिका आरोग्य विभागाकडून गोवरच्या केसेस हाताळण्यात दिरंगाई होत असल्याने पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
( हेही वाचा : बॉलीवूडचे हिंदूविरोधी षडयंत्र उद्ध्वस्त केले पाहिजे, सेवानिवृत्त मेजर सरस त्रिपाठींचे प्रतिपादन)
गोवरच्या चाचण्यांसाठी राज्यात स्वतंत्र गोवर तपासणी प्रयोगशाळा नसल्याने गोवरच्या अहवालांची माहिती बऱ्याच महिन्यांपासून दिरंगाईने येत आहे. मुंबईतील केवळ ८ केसेसचे अहवाल अजूनही आलेले नाहीत, अशी माहिती पालिका आरोग्य विभागाचे अधिकारी देतात. गोवरमुळे नऊ महिन्यांहून कमी वयाच्या बालकांचे मुंबईत मृत्यू होत असल्याच्या घटना नोंदवल्या जात आहेत. यातच जुन्या नमुन्यांचे अहवाल तब्बल महिन्याभराच्या दिरंगाईने पालिका आरोग्य विभागाला आता मिळत आहेत.
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून अंदाजे वीसहून अधिक गोवर तपासणी अहवाल महिन्याभराच्या दिरंगाईने येत आहेत. गोवरचे रुग्ण आठवड्याभराने बरे होत असल्याने भीतीचे कारण नाही असा दावा पालिका आरोग्य विभागाचे अधिकारी करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील वॉर्डनिहाय आरोग्य केंद्राकडून रुग्णांच्या सद्यस्थितीची माहितीही अद्याप आरोग्य विभागाने मागवलेली नाही. मुंबईतील गोवरच्या उद्रेकात मृत्यूसत्र सुरु आहेत. त्यामुळे केसेस शोधण्यात दिरंगाई करु नका, असे आवाहन राज्य गोवर टास्क फोर्सने केले आहे.
Join Our WhatsApp Community