ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे मुंबईतील कार्यालय तोडले

201

ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे मुंबईतील अनधिकृत कार्यालय तोडण्यात आले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. वांद्रे पूर्व भागातील परब यांच्या ऑफिसवर ही कारवाई करण्यात आली आहे. या पाडकामाच्या ठिकाणी किरीट सोमय्या मंगळवारी दुपारी भेट देणार आहेत.

अनिल परब यांच्या वांद्रे गांधीनगर येथे हे जनसंपर्क कार्यालय होते. त्यांचे हे कार्यालय अवैध असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. या कार्यालयाच्या बांधकामाविरोधात म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून मंगळवारी हतोडा चालवण्यात येणार होता. दरम्यान, त्याआधीच कार्यालय असलेल्या इमारतीच्या सोसायटीकडून स्वत:हून सोमवारी पाडकामास सुरुवात केली. परब यांच्या कार्यालयाचे पाडकाम जवळपास पूर्ण झाले आहे.

( हेही वाचा: मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि बसचा भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू )

म्हाडाकडून पाहणी होणार

म्हाडाच्या मुंबई मंडळाने मंगळवारी या बांधाकामावर हातोडा चालवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली होती. या कारवाईसाठी पोलीस संरक्षणही घेण्यात आले होते. मात्र, त्याआधी म्हणजे सोमवारी सोसायटी आणि परब यांच्याकडून पाडकाम करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आता मंगळवारी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी करण्यात येईल आणि त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही म्हाडाच्या एका अधिका-याने सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.