माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या वांद्रे परिसरातील अनधिकृत कार्यालयावर हातोडा पडला आहे. दरम्यान म्हाडाकडून अनधिकृत कार्यालयाचे बांधकाम पाडण्यात येणार होते. पण त्यापूर्वीच सोमवारी इमारतीच्या सोसायटीकडून स्वतःहून परबांचे कार्यालय पाडण्यास सुरुवात झाली. आता परब यांचे संपूर्ण कार्यालय पाडण्यात आले आहे. याबाबतची माहिती भाजप नेते किरीट सोमय्यांनी ट्विटद्वारे दिली आहे. तसेच परब यांचे अनधिकृत कार्यालय पाडल्यानंतर आता लक्ष साई रिसोर्ट आणि अस्लम शेख यांच्या स्टुडिओकडे असल्याचे किरीट सोमय्यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलताना सांगितले.
‘लोकायुक्तांच्या सुनावणीत झालेल्या निर्णयांचे पालन होत आहे’
किरीट सोमय्या म्हणाले की, ‘आता म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. पोलीस अधिकाऱ्यांसोबतही सकाळपासून चर्चा सुरू आहे. लोकायुक्तांच्या सुनावणी दरम्यान जो निर्णय झाला, त्या निर्णयाचे पालन होत आहे. ते जे अनधिकृत कार्यालय, ज्याच्यासाठी अनिल परब यांना जुन २०१९मध्ये नोटीस बजावण्यात आली आहे. ते बांधकाम आता जवळजवळ पूर्णपणे उद्धवस्त झाले आहे. बाकी राहिलेले काम म्हाडा पूर्ण करणार आहे. तसेच आता म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकाम असल्याचे मान्य केले आहे.’
(हेही वाचा – ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे मुंबईतील कार्यालय तोडले)
पुढे सोमय्या म्हणाले की, ‘अनिल परब यांचे जे कार्यालय तुडले ते वाचवण्यासाठी प्रचंड खटाटोप केली होती, उच्च न्यायालयात गेले होते. महिन्याभर म्हाडात सुनावणी सुरू होती. मिलिंद नार्वेकरांनी स्वतःच स्वतःचा अनधिकृत बंगला तोडला. अनिल परब यांचे कार्यालय तुटले. आता बारी उर्वरित साई रिसॉर्ट आणि अस्लम शेख यांच्या स्टुडिओची.’
Join Our WhatsApp Community