शाळेतील विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला! पुण्यातील धक्कादायक प्रकार

155

पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १७ वर्षीय विद्यार्थ्यावर कोयत्याचा हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. विजय आरडे हा बारावीमध्ये शिकत अशून पद्मवती भागात रहायला आहे तर समीर पठाण हा तुळशीबागेत काम करतो.

( हेही वाचा : मालेगावच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा छळ; अधीक्षकांसह तिघेजण बडतर्फ )

जखमी विद्यार्थी रुग्णालयात दाखल 

समीर पठाण यांच्या मैत्रिणीशी विजय आरडे बसस्टॉपवर बोलत होता. आपल्या मैत्रिणीशी बोलतो याचा राग पठाणला आला आणि त्याने विजयवर कोयता उगारला. या हल्ल्यात शेजारी असलेला विद्यार्थी सुद्धा जखमी झाला. वार झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली त्यानंतर जवळच असलेल्या वाहतूक पोलिसांनी जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले.

पुण्यातील महाविद्यालये, दुकाने अशा सार्वजनिक ठिकाणी सर्रास कोयत्याने हल्ले करण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे पुणेकर नागरिक भयभीत झाले आहेत. मैत्रिणीशी फक्त संवाद साधला या रागाने पठाणने विजयवर हल्ला केला या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.