मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे

215

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सोमवारी ३० जानेवारी रोजी पार पडलेल्या निवडणुकीत दैनिक ‘मुंबई लक्षदीप’चे पत्रकार प्रमोद डोईफोडे यांची बहुमताने अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदासाठी ‘टीव्ही ९’चे पत्रकार महेश पवार (५८ मते), कार्यवाहपदी ‘टुडे रायगड’चे पत्रकार प्रवीण पुरो (८५ मते) आणि कोषाध्यक्षपदी दैनिक ‘भास्कर’चे वरिष्ठ पत्रकार विनोद यादव (६७ मते) यांची निवड करण्यात आली.

कार्यकारिणीवर दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस’चे पत्रकार अलोक देशपांडे (७१ मते), दैनिक ‘लोकमत’चे पत्रकार मनोज मोघे (६८ मते), ज्येष्ठ पत्रकार कमलाकर वाणी (६१ मते), दैनिक ‘नवाकाळ’चे पत्रकार खंडूराज गायकवाड (५९ मते), दैनिक ‘डेक्कन क्रॉनिकल’चे भगवान परब (५८ मते) निवडून आले. दर दोन वर्षांनी मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाची निवडणूक होते.

(हेही वाचा – महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा बहुमान! पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.