म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी निघाली असून तुम्ही अर्ज भरला नसेल, तर तुम्ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून घरासाठी अर्ज भरू शकता. म्हाडाच्या पुण्याच्या घरांसाठी अर्ज भरण्याची शेवटची मुदत ५ फेब्रुवारी आहे. तर पेमेंट प्रक्रिया तुम्ही ६ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करू शकता. यंदाच्या लॉटरीमध्ये नागरिकांना २१ कागदपत्रांऐवजी ७ कागदपत्र जमा करावी लागणार आहेत. याशिवाय ही लॉटरी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप नसेल असे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
( हेही वाचा : मुंबईत एकाच वेळी ३८ ठिकाणची जलवाहिन्यांची कामे)
म्हाडा लॉटरी रजिस्ट्रेशन प्रक्रिया अनिवार्य
तुम्हाला म्हाडाचे घर घ्यायचे असेल तर तुम्ही म्हाडाच्या या अधिकृत वेबसाईटवर lottery.mhada.gov.in रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा. त्यानंतर तुम्ही अर्ज भरून पेमेंट करू शकता.
म्हाडाचे घर भाड्याने द्यायचे की नाही?
म्हाडाची लॉटरी लागल्यावर आपले घर भाड्याने द्यायचे की नाही हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. तुम्ही अर्ज भरला आणि लॉटरीत तुम्हाला घर लागले तर तुम्ही ते घर भाड्याने देऊ शकता. यासाठी तुम्हाला म्हाडाच्या प्राधिकरणाकडून एनओसी (NOC) घेऊन फ्लॅट भाड्याने देता येईल. फ्लॅट भाड्याने देण्याआधी योग्य कागदपत्रे जमा करण्यासंदर्भात तज्ज्ञांचा किंवा वकिलांचा सल्ला घ्या.
म्हाडाने मुंबई, पुणे, नागपूर या विभागांसाठी लॉटरी काढली आहे.
म्हाडाच्या पुण्याच्या लॉटरीसाठी महत्त्वाच्या तारखा
- ५ फेब्रुवारी – अर्ज करण्याचा शेवटचा दिवस
- ६ फेब्रुवारी – ऑनलाईन पेमेंटचा शेवटचा दिवस
- ६ फेब्रुवारी – NEFT पेमेंटचा शेवटचा दिवस
- १३ फेब्रुवारी – ड्राफ्ट अॅप्लिकेशन पब्लिश
- १५ फेब्रुवारी – फायनल अॅप्लिकेशन
- १७ फेब्रुवारी – लॉटरी ड्रॉ
- २० फेब्रुवारी – रिफंड