Budget 2023: अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्सह निफ्टीची उसळी

183

भारतासाठी बुधवारी, १ फेब्रुवारी हा दिवस मोठा आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) २०२३चा केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2023) सकाळी ११ वाजता सादर करणार आहेत. यंदाही अर्थमंत्री सीतारामण पेपरलेस बजेट सादर करणार आहेत. त्यामुळे सध्या देशाच्या अर्थसंकल्प सादर होताना सरकारच्या घोषणांवर बाजाराची नजर आहे. दरम्यान अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी बुधवारी शेअर बाजारात (Share Market) जोरदार सुरुवात झाली आहे. सेन्सेक्सह (Sensex) निफ्टीमध्ये (Nifty 50) उसळी पाहायला मिळत आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ मांडण्यापूर्वी शेअर बाजारात तेजी आली आहे. बुधवारी बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये ४५० अंकांपर्यंत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या सेन्सेक्स ४१३ अंकांच्या वाढीसह ५९,९९० अंकावर गेला आहे. तर निफ्टी १०७ अंकांच्या वाढीसह १७,७०७वर पोहोचला आहे. तसेच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया १० पैशांनी वधारून ८१.७८वर पोहोचला आहे.

(हेही वाचा – Budget 2023 : तंत्रज्ञान क्षेत्राला अर्थसंकल्पातून काय मिळणार? बजेटकडे देशाचे लागले लक्ष)

या कंपनींच्या शेअर्सवर राहिल अधिक लक्ष

हिंडनबर्ग अहवालामुळे अदानी ग्रुपचे स्टॉक अदानी एंटरप्रायझेस, अदानी पॉवर, अदानी पोर्ट्स, अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन, अदानी ट्रान्समिशन, अदानी विल्मार, एसीसी आणि अंबुजा यार अधिक लक्ष असेल. तसेच ब्रिटानिया, अशोक लेलँड, अजंता फार्मा, टाटा केमिकल्स या कंपन्यांचे निकालही बुधवारी येणार असल्यामुळे शेअर्समध्ये मोठी हालचाल होण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.