देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 2023-24 या आर्थिक वर्षासांठी अर्थसंकल्प सादर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचा हा पाचवा अर्थसंकल्प आहे. गेले वर्षभर सर्वसामान्य महागाईने त्रस्त आहेत, त्यांना या अर्थसंकल्पातून सीतारामण काय दिलासा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पातून काय स्वस्त काय महाग झाले ते जाणून घेऊया.
जगाने भारतीय अर्थव्यवस्थेला एक चमकता तारा मानले आहे. जगात भारताचा मान वाढला आहे. भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत आहे आणि उज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे. त्या म्हणाल्या की, कोरोनाच्या काळात कोणीही उपाशी झोपणार नाही याची आम्ही काळजी घेतली. सरकारने 2 लाख कोटी रुपये खर्च करुन प्रत्येक व्यक्तीला अन्नधान्य दिले. 80 कोटी लोकांना 28 महिन्यांसाठी मोफत रेशनची व्यवस्था करण्यात आली.
( हेही वाचा: Budget 2023: ‘या’ शब्दांचा अर्थ जाणून घ्या, तुम्हाला अर्थसंकल्प समजण्यास होईल सोपा )
हे स्वस्त
- बॅटरीवर चालणा-या आणि इलेक्ट्रीक वस्तू स्वस्त होणार
- मोबाईल फोन
- एलईडी टीव्ही
- इलेक्ट्रीक वाहने
- खेळणी
- कॅमेरा लेन्स
हे महाग
- सोन
- चांदी
- सिगारेट
- विदेशी किचन चिमणी
- चांदीची भांडी
Join Our WhatsApp Community