Budget 2023 : देशभरातील महिलांसाठी खुशखबर! अर्थसंकल्पात विशेष योजनांची घोषणा

185

अर्थमंत्री निर्मला सीतारामण या २०२३-२४ चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला आहे. २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा असणार आहे. अर्थसंकल्प सादर करताना भारताची अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत उज्जवल भविष्याकडे जात असल्याचे निर्मला सीतारामण म्हणाल्या. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पादरम्यान मोदी सरकारने महिलांसाठी विशेष घोषणा केल्या आहेत.

( हेही वाचा : Budget 2023 : गरिबांना वर्षभर मिळणार मोफत अन्नधान्य! अर्थमंत्र्यांची घोषणा )

महिलांसाठी खुशखबर!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्यात. यामध्ये स्त्रियांसाठी खास माहिला सन्मान बचत पत्र योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेत महिलांना बचतीवर ७.५ टक्के दराने व्याज मिळणार आहे.

देशाच्या सर्वांगीण विकासाठी यंदाच्या बजेटमध्ये ७ गोष्टींना प्राधान्य देण्यात आल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी स्पष्ट केले आहे. या सोबतच महिलांच्या विकासासाठी एक नवी योजना सीतारामन यांनी जाहीर केली आहे. महिलांचा आर्थिक विकास व्हावा तसेच त्यांचे सशक्तीकरण व्हावे यासाठी महिला सन्मान बचत पत्र योजना आणण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. यंदाच्या अर्थ संकल्पात महिलांच्या विकासावर मोदी सरकारने भर दिल्याचे पाहायला मिळाले. महिला सशक्तीकरण आणि त्यांच्या सक्षमीकारणासाठी त्यांनी या पूर्वीही विविध पावले उचलले आहेत. त्यामुळे यावर्षीही महिलांना या अर्थसंकल्पातून मोठी अपेक्षा होती. मोदी सरकारने या अपेक्षा ओळखून एक नवीन योजना खास महिलांसाठी आणण्याची घोषणा केली आहे.

महिलांच्या आर्थिक विकासासाठी महिला सन्मान बचत पत्र योजना आणली जाणार आहे. या योजनेनुसार २ लाखांच्या बचतीवर ७.५० टक्याने व्याज मिळणार आहे. या सोबतच नारी टू नारायणी योजना, उज्वला योजना, मिशन शक्ति योजना, मिशन वात्सल्य योजना, जाणधान योजना, महिला सेल्फ हेल्प ग्रुप, महिला बचत गट या सारख्या योजना मोदी सरकारने आणल्या आहेत. तर गेल्या वर्षी महिला आणि बाल कल्याणकारी योजनांसाठी २५ कोटी १७२.२८ कोटी एवढी तरतूद करण्यात आली होती. महिला सन्मान बचत पत्र योजनेमुळे महिलांना चांगले व्याजदर मिळणार आहे.

देशातील महिलांच्या सक्षणीकरणासाठी सरकारने नवीन योजना आखली आहे. ८१ लाख महिला बचतगटांचे सबलीकरण याद्वारे करण्यात येणार आहे. तसेच २८ महिने ८० कोटी नागरिकांना मोफत धान्या देण्यात येणार आहे.

गेल्यावर्षी अर्थमंत्र्यांनी महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या मिशन शक्ती, सक्षण अंगणवाडी, मिशन वात्सल्स आणि पोशन २.० यांसारख्या योजनांची घोषणा केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.