अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आपला पाचवा आणि देशाचा 75 वा अर्थसंकल्प सादर केला. कृषी, शिक्षण आणि गरिबांसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. यात त्यांनी उद्योगांसाठीही मोठ्या घोषणा केल्या आहेत. नवीन उद्योजकांना 10 वर्षांसाठी कर सवलत देण्यात आली आहे.
उद्योगांसाठी केलेल्या घोषणा
- नवीन उद्योजकांना 10 वर्षांसाठी कर सवलत
- 3 कोटी उलाढाल असलेल्या मायक्रो उद्योगांना करात सवलत
- कारागीर आणि शिल्पकारांसाठी पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान पॅकेजची घोषणा
- कोरोनाचा फटका बसलेल्या एमएसएमईंना दिलासा दिला जाईल
- MSMEसाठी कर्ज गॅसंटीची नवी योजना
- Gift IFSC मध्ये व्यापाराला चालना देण्यासाठी नव्या उपाययोजना
- MSME उत्पादनांची गुणवत्ता आणि पुरवठा सुधारण्यासाठी पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेचा लाभ घेऊ शकतील.
- इलेक्ट्रिक किचन चिमनीवरील कस्टम ड्युटी 7.5 टक्क्यांवरुन वाढवून 15 टक्के
- ज्येष्ठ नागरिक खाते योजनेची मर्यादा 4.5 लाखांवरुन 9 लाख
- कपडे आणि कृषीशिवाय इतर वस्तूंवर बेसिक कस्टम ड्युटी 21 टक्के वरुन घटवून 13 टक्के
- कौशल सन्मान योजनेने उत्पादनांचा दर्जा आणि मार्केटिंग सुधारली जाईल.
( हेही वाचा: देशात नवीन 157 नर्सिंग महाविद्यालये सुरु होणार; जाणून घ्या आरोग्य क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणा )
रिअल इस्टेट
- पीएम आवास योजनेचा खर्च 66 टक्क्यांनी वाढवून 79 कोटींपर्यंत नेला जाईल
- एअर कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी 50 नवी विमानतळे, हेलिपॅड,ड्रोन आणि लॅंडिंग ग्राऊंड बनवले जातील.
- सर्व शहरे आणि गावांतील मेनहोल आणि सेफ्टिंग टॅंकची स्वच्छता मशीनने केली जाईल
- आदिवासी जमातींना घर, स्वच्छ पाणी, शिक्षण आणि चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी पीएम प्रिमिटिव्ह व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स डेव्हलपमेन्ट मिशन लाॅन्च केले.