अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील हा अखेरचा अर्थसंकल्प असणार आहे. निर्मला सीतारामण यांच्या भाषणाची आणि अर्थसंकल्प सादर करण्याची पद्धत तसेच त्यांच्या आगमनापासून ते अर्थसंकल्प सादर करण्यापर्यंतच्या अनेक लहान-मोठ्या गोष्टींची सध्या चर्चा होत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाचे बहिखाते आणि अर्थमंत्र्यांच्या साडीचा रंग हा सारखाच होता त्यामुळे त्यांच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्यांनी बहुतांश वेळा हातमागावरील साड्या परिधान करण्यास प्राधान्य दिले. २०१९ ते आतापर्यंत अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांचा लूक कसा होता ते जाणून घेऊया…
( हेही वाचा : लवकरच कोविड काळातील मुंबई महापालिकेचा भ्रष्टाचार उघड करणार; सोमय्यांचा इशारा)
५ अर्थसंकल्प अन् ५ साड्या
२०२३ – लाल रंगाची संबलपुरी साडी
यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी लाल आणि काळ्या बॉर्डरच्या रंगाची साडी नेसली आहे. ही साडी प्रेम, शौर्य, विजय आणि ताकदीचे प्रतीक आहे तसेच “Vocal for Local Campaign” चा भाग आहे. त्या नेहमीत हातमाग आणि सिल्कच्या साड्यांचा वापर करताना दिसतात.
२०२२ – चॉकलेटी रंगाची सोनपुरी किंवा बोमकाई साडी
निर्मला सीतारामण यांनी २०२२ च्या अर्थसंकल्पात चॉकलेटी रंगाची बोमकाई प्रकाराची साडी नेसली होती. ही साडी ओडीशातून मागवण्यात आली होती. याद्वारे त्यांनी साधेपणा तसेच सुरक्षेचा संदेश दिला.
२०२१ – लाल आणि पांढऱ्या रंगाची पोचमपल्ली साडी
निर्मला सीतारामण यांनी कोविडनंतर मांडलेल्या अर्थसंकल्पात लाल आणि पांढऱ्या रंगाची रेशमी पोचमपल्ली साडी नेसली होती. ही साडी खास तेलंगणा येथून मागवली होती.
२०२० – पिवळ्या रंगाची कांजीवरम सिल्क साडी
२०२० मध्ये निर्मला सीतारामण यांनी पिवळ्या रंगाची कांजीवरम सिल्क साडी नेसली होती. ही वेशभूषा ‘महत्त्वकांक्षी भारत’ या संकल्पनेला अनुसरून होती.
२०१९ – गडद गुलाबी रंगाची मंगलगिरी साडी
२०१९ मध्ये निर्मला सीतारामण यांनी गडद गुलाबी रंगाची ‘मंगलगिरी सिल्क’ साडी नेसली होती. याद्वारे गंभीरता हा संदेश देण्यात आला.
Join Our WhatsApp Community