Budget 2023: सिगारेट महागल्यानंतर ITCचे शेअर्स घसरले

194

सरकारने यंदाच्या अर्थसंकल्प २०२३-२४मध्ये सिगारेटवरील राष्ट्रीय आपत्ती आकस्मिक शुल्क (NCCD) १६ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. दरम्यान गेल्या २ वर्षांपासून सिगारेटच्या ड्युटीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. पण आता सिगारेटवरील ड्युटी वाढल्यामुळे आयटीसी (ITC)सह इतर सिगारेटच्या शेअर्समध्ये मोठ्या हालचाली झाल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सिगारेटवर ड्युटी वाढवण्याची घोषणा केल्यानंतर आयटीसीच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. माहितीनुसार, आयटीसीचे शेअर्स ६ टक्क्यांपर्यंत घसरला आहे.

तर दुसरीकडे गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड आणि गोल्डन टोबॅकोच्या शेअर्समध्ये ४ टक्क्यांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. एनटीसी इंडस्ट्रीज आणि व्हीएसटी इंडस्ट्रीजमध्ये ०.५० टक्क्यांपासून घसरण झाली आहे.

एनएसईवर बुधवारी, दुपारी १.३७च्या सुमारास गॉडफ्रे फिलिप्स शेअर १,८४३.८०वर व्यवहार करत होता, जो ७९.४० म्हणजेच ४.१३ टक्क्यांनी घसरला. तर गोल्डन टोबॅकोचा शेअर २.२० टक्क्यांच्या वाढीसह ६०.३० रुपयांवर होता.

दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ मांडण्यापूर्वी शेअर बाजारात तेजी आली होती. बुधवारी, सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये ४५० अंकांपर्यंत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. तर सेन्सेक्स ४१३ अंकांच्या वाढीसह ५९,९९० अंकावर गेला होता. आणि निफ्टी १०७ अंकांच्या वाढीसह १७,७०७वर पोहोचला होता.

(हेही वाचा – Railway Budget 2023: रेल्वेसाठी २ लाख ४० हजार कोटींची तरतूद; २०१४च्या तुलनेत रेल्वे अर्थसंकल्पात ९ पटीने वाढ)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.