Budget 2023: ‘कोट्यवधी नागरिकांचं आयुष्य बदलणारा आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा अर्थसंकल्प’

225

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प २०२३-२४ बुधवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाईव्ह येऊन निर्मला सीतारामण यांचं अभिनंदन केलं. यंदाचा अर्थसंकल्प कोट्यवधी नागरिकांचं आयुष्य बदलेलं. तसंच मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी पहिली प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षणीकरणाच्या दिशेनं पाऊल टाकलं असून ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्थेतील दरी कमी होईल, असं प्रतिपादन मोदींनी केलं.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘अमृत काळातील हा पहिला अर्थसंकल्प आहे. देशाची सर्वात मोठी ताकद मध्यमवर्ग आहे. या मध्यमवर्गात समृद्ध आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची सक्षम ताकद आहे. जसं युवा वर्ग भारताची ताकद आहे, तसं मध्यमवर्ग ही देशाची जमेची बाजू आहे. दरम्यान प्राप्तिकर रचना अधिक पारदर्शक केल्यामुळे मध्यमवर्गाला आणखीन दिलासा मिळणार आहे. हा अर्थसंकल्प संपूर्ण अर्थव्यवस्थेला गती देईल.’

शेतकऱ्यांना सक्षम बनवणारा अर्थसंकल्प

पुढे मोदी म्हणाले की, ‘हा अर्थसंकल्प अल्पभूधारक शेतकऱ्यांना सक्षम बनवणारा आहे. प्रत्येक क्षेत्रात आपण आधुनिकतेची कास धरायला हवी. पायभूत सुविधांच्या विकासावर अधिक भर देणं गरजेचं आहे. लहान आणि सुक्ष्म उद्योगांना बळ देण्याचा प्रयत्न केला जात आहे.’

(हेही वाचा – Budget 2023: निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात उल्लेख केलेलं ‘श्रीअन्न’ म्हणजे काय?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.