ठाणेकरांनो! मुंबई मेट्रो लाईन-४ च्या कामामुळे कासारवडवली ते गायमुखपर्यंत वाहतूक मार्गांत बदल; ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर

224

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात कासारवडवली ते गायमुखपर्यंत मुंबई मेट्रो लाईन-४ चे काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या कासारवडवली सिग्नल ते नागलाबंदर सिग्नलपर्यंतच्या मार्गावरील पिलरवर गर्डर टाकण्याच्या कामामुळे १ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत रात्री ११.५५ ते सकाळी ४.०० वाजेच्या दरम्यान ठाणेकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी वाहिनी जड अवजड वाहनांकरता वाहतुकीस बंद करण्यात येणार असल्याने या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉक्टर विनयकुमार मे. राठोड यांनी दिली आहे.

वाहतुकीत बदल पुढीलप्रमाणे …

प्रवेश बंद – १) मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणा-या सर्व जड- अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात आलाआहे.

पर्यायी मार्ग – अ) मुंबई ठाणेकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड- अवजड वाहने कापूरबावडी वाहतूक शाखा जवळून उजवे वळण घेऊन खारेगाव टोलनाका मानकोली, अंजुर फाटामार्गे इच्छित स्थळी जातील.

ब) मुंबई ठाणे कडून पोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड- अवजड वाहने कापूरबावडी जंक्शन जवळून उजवे वळण घेऊन कशेळी, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद – २) मुंब्रा, कळवाकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड- अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग – मुंब्रा, कळवाकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड- अवजड वाहने गॅमनमार्गे खारेगाव खाड़ी ब्रिज खालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद – ३) नाशि कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड- अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग – नाशिककडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड़- अवजड वाहने मानकोली ब्रिज खालून उजवे वळण घेऊन अंजुर फाटामार्गे इच्छित स्थळी जातील.

( हेही वाचा: परीक्षा केंद्रावर उशिरा जाल तर परीक्षेला मुकाल; दहावी-बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना सूचना )

जड -अवजड वाहने सोडून इतर वाहने ही गर्डर टाकण्याचे वेळी कासारवडवली सिग्नल पेट्रोल पंप कट घेऊन डावे वळण घेऊन सेवा रस्त्याने पुढे नागलाबंदर सिग्नल कट जवळ उजवे वळण घेऊन मुख्य रस्त्यावरुन इच्छित स्थळी जातील.

  •  दि. ०१ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. ०२ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ०४.०० वाजेपर्यंत.
  •  दि. ०२ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि.०३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत.
  • दि.०३ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. ०४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत.
  • दि.०४ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. ०५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत.
  •  दि.०५ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. ०६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत.
  • दि. ०६ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. ०७ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत
  • दि.०७ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. ०८ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ०४.०० वाजेपर्यंत.

ही वाहतूक अधिसूचना वर नमूद कालावधी दरम्यान गर्डर टाकण्याचे काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहणार आहे. ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सीजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाहीत, असे ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी दिली आहे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.