कुर्ला येथील क्रिटीकेअर रुग्णालयात गुरुवारी, 2 फेब्रुवारी रोजी सकाळी ४५ वर्षीय महिलेच्या मृत्यूपश्चात अवयवदान झाले. या महिलेला पक्षाघाताचा त्रास झाल्याने दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मेंदू मृत झाल्याने तिला डॉक्टरांना वाचवता आले नाही. मृत्यूपश्चात या महिलेकडून हृदय, मूत्रपिंडे, यकृताचे दान करण्यात आल्याने चार रुग्णांना नवी संजीवनी मिळाली.
नेमकी घटना काय?
मध्य प्रदेशात राहणा-या महिलेने धार्मिक कार्यक्रमासाठी मुंबई गाठली होती. दरम्यानच तिला पक्षाघाताचा त्रास झाला. पहिल्यांदा तिला उपचारांसाठी घाटकोपर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला उपचारांसाठी व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. घाटकोपर येथून मंगळवारी महिलेला कुटुंबीयांनी कुर्ला येथील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सर्व तपासण्यानंतर तिला मेंदू मृत जाहीर केले. डॉक्टरांनी महिलेच्या कुटुंबीयांना अवयवदानाची कल्पना दिली. अखेरिस कुटुंबीयांनी अवयवदानास होकार दिल्यानंतर गुरुवारी सकाळी अवयवदान झाले. दुपारी कुटुंबिय मध्य प्रदेशासाठी रवाना झाले. यंदाच्या वर्षातील मुंबईतील हे चौथे अवयवदान आहे.
(हेही वाचा पुरातत्व खात्याच्या विरोधात शिवप्रेमी दिल्ली उच्च न्यायालयात)
Join Our WhatsApp Community