देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले योगी आदित्यनाथ; वाचा दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण?

183

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री असल्याचे मत जनतेने व्यक्त केलेय. इंडिया टुडे आणि सी-व्होटरच्या सर्वेत ही माहिती पुढे आली आहे.

भारतातील ३० राज्यांमध्ये लोकनिर्वाचित सरकार आहेत. त्यामध्ये दिल्ली आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांचा देखील समावेश आहे. या सर्व राज्यांमधील मुख्यमंत्र्यांची कार्यप्रणालीचे इंडिया टुडे आणि सी-व्होटर्सने सर्वेक्षण केले. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सर्वोत्कृष्ट असल्याचे मत देशातील जनतेने व्यक्त केले. या सर्वेक्षणात जेव्हा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री निवडण्याचा मुद्दा आला तेव्हा योगी आदित्यनाथ लोकांची पहिली पसंती ठरले आहेत. सर्वेक्षणानुसार ३९.१ टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांची सर्वोत्तम कामगिरी करणारे मुख्यमंत्री म्हणून निवड केली आहे.

या यादित दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सर्वेक्षणातील १६ टक्के लोकांनी अरविंद केजरीवाल यांना आपली पसंती दिली आहे, तर ७.३ टक्के लोकांनी ममता बॅनर्जी यांना पसंती दिली आहे. ज्या सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

सर्वेक्षणानुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता त्यांच्या कामामुळे वाढली आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अरविंद केजरीवाल यांच्या लोकप्रियतेत ६ टक्क्यांनी घट झाली आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये केजरीवाल यांना २२ टक्के लोकांची पसंती होती. ममता बॅनर्जी यांच्या लोकप्रियतेतही गेल्या वर्षभरापासून १ टक्क्यांनी घट झाली आहे. देशातील ३० राज्यांमध्ये सर्वोत्तम मुख्यमंत्री निवडण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये १ लाख ४० हजार ९१७ लोक सहभागी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यासोबत सर्वेक्षणानुसार केंद्रात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होईल आणि भाजपला २८४ जागा मिळतील असे मत व्यक्त करण्यात आलेय.

(हेही वाचा – अदानी समूहाच्या घोटाळ्यात थेट भाजपाचा हात; संजय राऊतांचा गंभीर आरोप)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.