मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा स्थगित; शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा परिणाम

158

सोलापूर आणि कोल्हापूर विद्यापीठानंतर आता मुंबई विद्यापीठाच्या शुक्रवार, २ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा मुंबई विद्यापीठ, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. परीक्षेच्या कामकाजावरील बहिष्कारच्या आंदोलनामुळे मुंबई विद्यापीठाने सर्व परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थगित परीक्षांचे लवकरच सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या शुक्रवारपासूनच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात

राज्यातील अकृषी विद्यापीठे त्यासोबतच महाविद्यार्थी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. त्यामध्ये परीक्षावरील कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने घेतला आहे. परीक्षेच्या कामकाजावरील बहिष्काराच्या आंदोलनामुळे मुंबई विद्यापीठाच्या शुक्रवारपासूनच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. स्थगित केलेल्या सर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल, असे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या हिवाळी सत्राच्या विविध विद्याशाखेच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा विविध केंद्रावर सुरू आहेत. अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने दोन फेब्रुवारीपासून परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. आंदोलनामुळे परीक्षेच्या कामकाजामध्ये अडचणी निर्माण झाल्याने मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा शुक्रवारपासून स्थगित करण्यात आल्या आहेत. स्थगित केलेल्या सर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल.

(हेही वाचा …तर भारताला हिंदू राष्ट्र होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही! – धीरेंद्र शास्त्री)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.